Ad will apear here
Next
‘गोगटे-जोगळेकर’मध्ये गोळा झाला १०० किलो ई-कचरा
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात गोळा झालेला ई-कचरा.रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शहरातील सुमारे शंभर किलो ई-कचरा गोळा झाला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘गोगटे-जोगळेकर’कडून ई-कचरा आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियानाला नगरपालिकेने सहकार्य केले आहे. गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेच्या कचरा गाड्या दोन ऑक्टोबरला शहरातून ई-कचरा गोळा करण्यासाठी फिरणार आहेत.

स्वच्छतेबाबत नागरिक जागरूक झाले आहेत. जैव विघटनशील, हानीकारक कचरा वेगवेगळा करून घंटा गाडीमध्ये दिला जातो. इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक कचरा घरात पडून राहतो. काही वेळा तो विघटनशील कचऱ्यासोबत दिला जातो. हा कचरा पर्यावरणाला घातक असल्याने महाविद्यालयाने पुढाकार घेऊन ई-कचरा गोळा करण्याचे आवाहन केले होते. विद्यार्थ्यांनीही आपापल्या परिसरामध्ये आवाहन केले. त्यानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या  वेळेत महाविद्यालयात ई-कचरा गोळा झाला. मुंबईतील एनजीओ इकोरॉक्स या संस्थेसोबत महाविद्यालयाचा सामंजस्य करार झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कचरा सरकारमान्य संस्थेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

जमा झालेल्या कचऱ्यामध्ये बंद पडलेले मोबाइल, चार्जर्स, वायर्स, टीव्ही, कॉम्प्युटर, की-बोर्ड, हार्ड डिस्क आदी कचऱ्याचा समावेश आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी पालिकेच्या दोन गाड्या दोन ऑक्टोबरला शहरात फिरणार आहेत. नागरिकांनी त्यांच्याकडे असलेला ई-कचरा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZYRBT
Similar Posts
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती रत्नागिरी : रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने जैवविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेंद्रिय खत प्रकल्प उभारला आहे. तब्बल सहा हजार किलो कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. महाविद्यालयाच्या आवारात तीन ठिकाणी उभारलेल्या या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. या प्रकल्पाद्वारे
रत्नागिरीतील ई-कचऱ्यावर होणार प्रक्रिया रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि मुंबईतील इकोरॉक्स या सामाजिक संस्थेत सामंजस्य करार झाला असून, या अंतर्गत महाविद्यालयामार्फत गोळा केल्या जाणाऱ्या ई-कचऱ्यावर ‘इकोरॉक्स’तर्फे प्रक्रिया केली जाणार आहे.
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले
गांधीजी आणि शास्त्री जयंतीनिमित्त ‘जीजीपीएस’मध्ये विविध उपक्रम रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language